Mumbai Rain Update : दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर; थंड वाऱ्यांमुळे मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Update : गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाडा आणि दमट हवामानाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना वरुणराजाने सलग दुसऱ्या दिवशी मोठा दिलासा दिला आहे.

Mumbai Rain Update : मुंबईच्या विविध भागांत सोमवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. काही भागांत तर अवघ्या एका तासात जोरदार सरी कोसळल्या, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Mumbai Rain Update)
शहराच्या काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे उकाडा आणि दमट हवामानापासून मोठा दिलासा मिळाला. ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्यांमुळे संपूर्ण महानगरातील सकाळ आल्हाददायक ठरली. नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) साधारणपणे १० जूनच्या सुमारास मुंबईत दाखल होतात. (Mumbai Rain Update)
परंतु यंदा त्यांच्या आगमनाला विलंब झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मान्सून दक्षिण कोकणात पोहोचला असला तरी, प्रतिकूल हवामानामुळे त्याची पुढील वाटचाल काही काळ थंडावली होती. (Mumbai Rain Update)
सोमवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आणि काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. या कालावधीत पाणी साचण्याच्या किंवा पावसाशी संबंधित इतर कोणत्याही मोठ्या घटनेची नोंद झाली नाही. सार्वजनिक वाहतूक सेवाही सुरळीत सुरू होत्या. (Mumbai Rain Update)
विविध भागांतील पावसाची आकडेवारी
बीएमसीच्या आकडेवारीनुसार, सकाळी ६ ते ७ या वेळेत आयलंड सिटी भागात सरासरी १७ मिमी, पश्चिम उपनगरांमध्ये १० मिमी पावसाची नोंद झाली, तर पूर्व उपनगरांमध्ये पावसाची कोणतीही नोंद झाली नाही. (Mumbai Rain Update)
आयलंड सिटीमधील वरळी नाका येथील सावित्रीबाई फुले बीएमसी शाळेत एका तासात ६१ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर प्रभादेवी येथे ५८ मिमी, वरळीतील आदर्श नगर शाळा आणि मलबार हिल येथे प्रत्येकी ४४ मिमी, वरळी अग्निशमन केंद्र येथे ४२ मिमी आणि एफ-दक्षिण विभाग (परळ) येथे ४१ मिमी पावसाची नोंद झाली. (Mumbai Rain Update)
वांद्रे येथील पाली चिंबई शाळा आणि सुपारी टँक बीएमसी शाळा या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ७० मिमी पावसाची नोंद झाली. खार येथे ३० मिमी, वांद्रे अग्निशमन केंद्र येथे २८ मिमी आणि बनाना लीफ व जुहू दवाखाना येथे प्रत्येकी २५ मिमी पाऊस पडल्याची माहिती महापालिकेने दिली. (Mumbai Rain Update)






