मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कंटनेर, गॅस टँकर आणि कारचा भीषण अपघात

मुंबई : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. आज सकाळी मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर अशीच एक भीषण अपघाताची घटना घडली. यामध्ये खालापूर हद्दीतील बोगद्याजवळ कंटेनर, गॅस टँकर आणि कारने एकमेकांना धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, काहीजण गंभीर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात तिन्ही वाहनांचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
काय घडले नेमके?
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास तीन वाहने एकमेकांवर धडकले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. हा अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अक्षय ढेले (वय, 30) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अक्षय हा लातूरच्या अहमदपूर येथील रहिवाशी आहे. या भीषण अपघातानंतर आरोपी कंटेनर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.





