Mumbai News : मोठी बातमी ! मुंबईमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सुरक्षिततेचा खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात (Mumbai News) कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

Mumbai News : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सुरक्षिततेचा खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात (Mumbai News) कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश २३ जुलै २०२६ (मध्यरात्री १२:०१ पासून) ते ६ ऑगस्ट २०२६ (मध्यरात्री १२:०० वाजेपर्यंत) असे पुढील १५ दिवस लागू राहतील.
दिल्लीत सुरू असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai News) सार्वजनिक शांतता भंग होणे, कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण होणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणे यांसारख्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
कशावर असेल पूर्ण बंदी?
पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई: सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमण्यावर बंदी असेल.
कोणत्याही प्रकारच्या राजकीय, सामाजिक वा इतर मिरवणुका काढता येणार नाहीत.
मिरवणुकी दरम्यान लाऊडस्पीकर, वाद्यवृंद (बँड) वाजवणे आणि फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी असेल.
काय सुरू राहील?
सर्व प्रकारचे विवाह सोहळे, अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी किंवा दफनभूमीकडे जाणाऱ्या मिरवणुकांवर कोणतीही बंदी नसेल.
कंपन्या, क्लब, सहकारी संस्था आणि इतर संघटनांच्या कायदेशीर तसेच नियमित बैठकांना (Mumbai News) परवानगी असेल.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने आणि कारखाने यांचे नियमित कामकाज पूर्ववत सुरू राहील.
विभागीय पोलिस उपआयुक्तांची (DCP) पूर्वपरवानगी घेतलेल्या संमेलनांना आणि मिरवणुकांवर बंदी लागू असणार नाही.






