Mumbai News : मुंबईत सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मुंबईच्या (Mumbai News) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा डिरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने पर्दाफाश केला आहे.

Mumbai News : मुंबईच्या (Mumbai News) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा डिरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सने पर्दाफाश केला आहे.
या कारवाईदरम्यान, बँकॉकहून तस्करी करून आणलेले आणि 7.49 कोटी रुपये मूल्य असलेले पाच किलोहून अधिक सोने (Mumbai News) जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी डीआरआयने सहा जणांना अटक केली आहे.
यामध्ये विमानतळावरील विविध दुकानांमध्ये काम करणारे तीन कर्मचारी आणि तीन फिलिपिन्सच्या नागरिकांचा समावेश आहे. चौकशी आणि तपासादरम्यान तस्करीची एक धक्कादायक पद्धत समोर आली.
सोने पावडरच्या स्वरूपात होते आणि ते मेणामध्ये लपवून ठेवण्यात आले होते. संशय येऊ नये म्हणून आरोपी मेणात गुंडाळलेली ही सोन्याची पावडर एकमेकांना सोपवत होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींनी (Mumbai News) चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीच्या सूत्रधारांच्या (हँडलर्स) सूचनांनुसार काम करत असल्याचे त्यांनी मान्य केले.






