Mumbai News : मुंबईत 4.5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; 4 जणांना अटक
मुंबई पोलिसांनी ४.५ कोटी रुपये किमतीचा गांजा आणि मेफेड्रोन जप्त केले असून, चार जणांना (Mumbai News) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी तिघे जण सराईत गुन्हेगार असून, त्यांचा संबंध एका हत्या प्रकरणाशीही आहे.

Mumbai News : मुंबई पोलिसांनी ४.५ कोटी रुपये किमतीचा गांजा आणि मेफेड्रोन जप्त केले असून, चार जणांना (Mumbai News) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी तिघे जण सराईत गुन्हेगार असून, त्यांचा संबंध एका हत्या प्रकरणाशीही आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने शनिवारी वांद्रे पश्चिम येथील एका घरावर छापा टाकला. यावेळी १.५ कोटी रुपये किमतीचा १.५ किलो चरस जप्त करण्यात आला आणि ४० वर्षीय अमली पदार्थ विक्रेत्याला अटक करण्यात आली. दुसऱ्या (Mumbai News) एका कारवाईत रविवारी अमली पदार्थ विरोधी पथकाने बोरीवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तीन सराईत गुन्हेगारांना पकडले.
त्यांच्याकडून ३.०८ कोटी रुपये किमतीचे १.०२ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले, जे त्यांनी नालासोपारा येथून आणले होते. प्राथमिक चौकशीतून समोर आले की, या तिन्ही संशयितांचा गुन्हेगारी इतिहास असून, त्यात एका हत्या प्रकरणाचाही समावेश आहे. या तिघांनी नालासोपारा येथून हा साठा मिळवला होता आणि तो वितरणासाठी मुंबईत आणला होता.
आरोपींविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस कायद्यांतर्गत (Mumbai News) गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.






