Mumbai News : ‘केईएम’ रुग्णालयाचे नाव बदलण्यावरुन वाद; “सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का?” ठाकरे गटाचा आक्रमक सवाल
केईएम (KEM Hospital ) मार्डने या नामांतराला जोरदार विरोध केला आहे. यानंतर आता राजकीय वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. रुग्णालयाच्या नामकरण प्रस्तावामुळे रुग्णालयाचा ऐतिहासिक वारसा पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.

Mumbai News : मुंबईतील किंग एडवर्ड स्मारक म्हणजेच केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र केईएम मार्डने या नामांतराला जोरदार विरोध केला आहे. यानंतर आता राजकीय वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. रुग्णालयाच्या नामकरण प्रस्तावामुळे रुग्णालयाचा ऐतिहासिक वारसा पुसण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.
Kailash Kher : गाण्याची विनंती करताच कैलाश खेर संतापले; म्हणाले, “कलाकाराला जोकर बनवू नका”
मार्डकडून नाराजी व्यक्त (KEM Hospital)
यावर निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टरांच्या मते, केईएम हे नाव एका ब्रँडसारखे असून जगभरातील संशोधन पत्रिकांमध्ये याच नावाची नोंद आहे. नाव बदलल्यास प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai News : ‘केईएम’ रुग्णालयाचे नाव बदलण्यावरुन वाद; “सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का?” ठाकरे गटाचा आक्रमक सवाल
राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबतचे अधिकृत पत्र आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांना दिले होते. हे पत्र आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आले. सत्ताधारी बहुमताच्या जोरावर या पत्राला मंजुरी देण्यात आली.
सध्या हा नामांतराचा ठराव पुढील तांत्रिक प्रक्रियेसाठी आणि अभिप्रायासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नवीन नावातूनही ‘केईएम’ हे संक्षिप्त रूप कायम राहील, असा दावा लोढा यांनी केला आहे.
ठाकरे गटाकडून आंदोलन (KEM Hospital)
ठाकरे गटाने रुग्णालयाचे मूळ नाव बदलण्यास कडाडून विरोध केला आहे. आज २७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शिवडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने केईएम रुग्णालयाच्या परिसरात निदर्शने करण्यात येणार आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का? माननीय मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis जी, कृपया आपण यात हस्तक्षेप करावा, ही नम्र विनंती!
— मिलिंद नार्वेकर, आमदार (विधानपरिषद) pic.twitter.com/xcvM894sjf
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) April 26, 2026
यावर ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. “केईएम रुग्णालयाचे नाव तुम्ही बदलत असाल तर सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावे बदलणार का?,” असा सवालही त्यांनी विचारला आहे.
हेही वाचा :
Kailash Kher : गाण्याची विनंती करताच कैलाश खेर संतापले; म्हणाले, “कलाकाराला जोकर बनवू नका”





