Mumbai NCB Raid : ‘या’ चित्रपटासाठी दिला होता शाहरुखचा लेक ‘आर्यन खान’ने पहिल्यांदा आपला आवाज

मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा ‘आर्यन खान’चा सुद्धा समावेश आहे.
सध्या या सर्वांची एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.
आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले असून यामध्ये ‘अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.
‘या’ चित्रपटासाठी दिला होता आर्यन खानने आवाज –
1994 मध्ये डिजनीतर्फे पहिल्यांदा रिलीज करण्यात आलेला ऍनिमेटेडपट ‘द लायन किंग’ हा चित्रपट 2019 मध्ये नव्या ढंगात आणि नव्या रूपात रसिकांच्या भेटीला आला होता. किंग खान शाहरुख आणि त्याचा लेक आर्यनमुळे हा चित्रपट मोठा चर्चेत होता.
चित्रपटामध्ये बाप लेकाच्या या जोडीने अॅनिमेटेड प्राणी पात्रांना आवाज दिला आहे. अभिनेता शाहरुख खानने जंगलचा राजा मुफसा आणि मुलगा आर्यन खानने छोटा बछडा सिंबासाठी आपला आवाज दिला आहे.





