Mumbai-Nashik Highway: भाजप खासदाराच्या धावत्या कारला आग; कोट्यावधींची रेंज रोव्हर जळून खाक
Mumbai-Nashik Highway: इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली.
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावर शुक्रवारी रात्री एका भाजपच्या खासदाराच्या आलिशान कारला भीषण आग लागली. या आगीत रेंज रोव्हर पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे खासदारासह कारमधील सर्व प्रवासी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राजस्थानमधील जालोर-सिरोही मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार लुंबा रामजी चौधरी यांची ही कार होती. खासदार लुंबा रामजी चौधरी हे वाशिम येथील दौरा आटोपून महाशिवरात्रीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारीही कारमध्ये होते. शहापूर येथील चालक अनिल बबन जाधवहे ही कार चालवत होते.
Pune RTO : पुणे आरटीओचा मोठा दणका! ३ हजार ६०० वाहन परवाने निलंबित; तुमचं नाव तर नाही ना या यादीत?
चालकाच्या प्रसंगवधानामुळे अनर्थ टळला
कार नाशिक जवळील गोंदे फाटा परिसरात आली असताना, चालक जाधव यांना अचानक गाडीतून काहीतरी जळाल्याचा वास आला. इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. मात्र आग वाढत असल्याचे पाहून चालक अनिल जाधव यांनी तातडीने खासदार चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. Mumbai-Nashik Highway
सर्व प्रवासी गाडीतून सुखरूप खाली उतरल्यानंतर काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि क्षणातच कोट्यावधी रुपयांची कार जळून खाक झाली. यादरम्यान, हायवेवर धावत्या कारने पेट घेतल्यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. Mumbai-Nashik Highway
हेही वाचा:





