Mumbai local : मोठा अपघात टळला.! एकाच ट्रॅकवर समोरासमोर दोन लोकल, नेमकं काय घडलं?
ऐन गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्याने CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

Mumbai local : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या CSMT स्थानकात आज दुपारी सुमारे ३:१५ ते ३:२० च्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. Mumbai local
बदलापूरहून येणारी एक जलद लोकल नियोजित प्लॅटफॉर्म क्रमांक ४ ऐवजी चुकून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ कडे वळवण्यात आली. त्या वेळी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर आधीच एक लोकल उभी होती. Mumbai local
दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर समोरासमोर येत असल्याचे लक्षात येताच मोटरमनने प्रसंगावधान राखत तातडीने ब्रेक लावले. त्यामुळे संभाव्य भीषण अपघात टळला. Mumbai local
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ८ दरम्यानची रेल्वे वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबवण्यात आली. संबंधित लोकल सुरक्षितपणे मागे (बॅकिंग करून) घेण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. (Mumbai local)
दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळी जलद मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्याने CSMTसह इतर स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. काही गाड्या उशिराने धावल्या. (Mumbai local)
रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून सिग्नल प्रणालीतील बिघाड किंवा मानवी त्रुटी यापैकी नेमके कारण काय, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. (Mumbai local)
सध्या वाहतूक हळूहळू पूर्ववत होत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेमुळे नागरिकांनी बस आणि टॅक्सी या वाहनांसमोर रांगा लावल्यात आहेत.






