Rohit Sharma : ‘…म्हणून रोहित फिल्डिंग ऐवजी फक्त बॅटिंग करतोय’; हिटमॅनबद्दल कोच जयवर्धनेने केला खुलासा

Mahela Jayawardene reveals Rohit Sharma’s Role as Impact Player : आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा फॉर्ममध्ये नव्हता. पण गेल्या काही सामन्यांमध्ये रोहितची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये त्याने तीन अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र, चालू हंगामात तो बऱ्याचदा क्षेत्ररक्षण करताना दिसला नाही आणि तो बहुतेकदा प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळला आहे. सोमवारी, मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी या मागील कारण सांगितलं आहे.
महेला जयवर्धने रोहितबद्दल काय म्हणाले?
महेला जयवर्धने म्हणाले की, रोहित शर्माला प्रभावशाली खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) म्हणून उतरवण्याचा निर्णय हंगामाच्या सुरुवातीलाच घेण्यात आला होता. त्याने सांगितले की रोहित शर्माला किरकोळ दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला या भूमिकेत ठेवण्यात आले होते. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचा वापर प्रभावशाली खेळाडू म्हणून करण्यात आला आहे. तो फक्त डावाच्या शेवटी क्षेत्ररक्षणासाठी येत आहे.
Mahela Jayawardene🎙️
Rohit Sharma has been carrying a niggle since the Champions Trophy🏆. That’s why he’s playing as an Impact Player and leading the team off the field. pic.twitter.com/RTUkezdqG2
— Veer (@WorshipRohit) May 5, 2025
धावू शकणारे खेळाडू हवे असतात –
प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले, “नाही, सुरुवातीला ते नव्हते. अर्थातच, रोहित काही सामन्यांमध्ये मैदानावर होता. पण जर तुम्ही संघ संयोजन पाहिले तर बहुतेक खेळाडू दुहेरी भूमिका बजावत आहेत. गोलंदाजी जास्त करत आहेत. आपल्याला धावू शकणारे खेळाडू हवे असतात. म्हणून हा देखील खेळाचा एक भाग आहे.”
हेही वाचा – SRH vs DC : पॅट कमिन्सचा कहर! सलग तीन षटकातील पहिल्याच चेंडूवर केला खास पराक्रम पाहा VIDEO
रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुखापत – महेला जयवर्धने
जयवर्धने पुढे म्हणाले, “रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये किरकोळ दुखापत झाली आहे. म्हणून आम्हाला त्यांच्यावर जास्त दबाव आणायचा नव्हता आणि आम्ही ते करण्यात यशस्वी झालो, म्हणून फलंदाजी करणे अधिक महत्त्वाचे आहे. तो मैदानावर असो वा नसो, त्याने खूप योगदान दिले आहे. जर तुम्ही लक्ष दिले असेल तर तुम्हाला समजेल की, तो नेहमी डगआउटमध्ये बोलत असतो किंवा टाइमआउट दरम्यान आत जातो. त्यावेळी तो संघासोबत चर्चा करताना खूप मार्गदर्शन करतो. अशा प्रकारे तो खूप सक्रियपणे सहभागी असतो.”





