Mumbai Crime : केअरटेकरकडून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला, पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

मुंबई – मुंबईतील एका वृद्ध जोडप्यावर त्यांच्या केअरटेकर इसमानेच हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. त्यात वृद्धाचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. हल्लेखोराचे नावे पप्पु गवळी असे असून तो 29 वर्षीय आहे.
ही घटना सोमवारी रात्री जोगेश्वरी येथे घडली आणि पप्पू गवळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केअरटेकरला नंतर दादर रेल्वे स्थानकावर तो मूळ गावी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पकडण्यात आले.
मेघवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी येथील एका हाऊसिंग सोसायटीतील वृद्ध दाम्पत्यावर त्यांच्या राहत्या घरी केअरटेकरने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक सुधीर चिपळूणकर (70) यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी सुप्रिया चिपळूणकर (69) जखमी झाल्या.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/congress-jairam-ramesh-writes-to-rbi-sebi-chiefs-seeking-probe-into-allegations-against-adani-group/
गवळी हा दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच त्याच्या मालकांच्या घरात घुसला आणि त्याने दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.सुधीर चिपळूणकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी असूनही त्यांनी शेजारी आणि इमारतीतील इतर रहिवाशांचे लक्ष वेधण्यासाठी घरातील सामान फ्लॅटच्या खिडकीतून फेकण्यास सुरुवात केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी वेगवान मोहीम राबवून सदर हल्लेखोराच्या मुसक्या बांधल्या.





