शाहरुखचं टेन्शन वाढलं ! आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कस्टडी

मुंबई – मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीतून अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना एक दिवसांची एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली होती. मात्र आता यात वाढ कऱण्यात आली असून त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुख खानचं टेन्शन वाढलं आहे.
मुंबई किनाऱ्यावरील एका क्रूझवर एका पार्टीमध्ये केलेल्या छाप्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आज दुपारी 2.30 वाजता कोर्ट क्रमांक 8 मध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली.
यावेळी एनसीबीनं 13 ऑक्टोबर पर्यंत आर्यनची कस्टडी मागितली होती. मात्र कोर्टाने 7 ऑक्टोबर पर्यंत एनसीबीला आर्यनची कस्टडी दिली आहे. त्यामुळे आर्यनला आणखी तीन दिवस कस्टडीत राहवे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्यन खानसह अन्य तीन आरोपींना देखील सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली गेली आहे.
Mumbai | All accused arrested yesterday following NCB raid on a cruise ship off Mumbai coast brought to a city court pic.twitter.com/LgW93ZdyuN
— ANI (@ANI) October 4, 2021
ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खानची बाजू न्यायालयात मांडली. ते म्हणाले की, आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. “आर्यनकडे बोर्डिंग पास नव्हता आणि कोणतीही सीट किंवा केबिन नव्हते. तसेच जप्ती करताना त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सापडलेले नाही. त्याला फक्त व्हॉट्स अॅप चॅट्सच्या आधारावर अटक करण्यात आल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.





