Mulshi News : मुळशीत ठाकरे गटाला ‘ऊर्जा’ ; अविनाश बलकवडे यांच्या उपस्थितीत अनेक युवकांचा पक्षप्रवेश

प्रभात वृत्तसेवा
पौड – दिवाळी पाडवा मुहर्तावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव अविनाश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक युवकांनी कोळवण येथे शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला प्रेरित होऊन, तसेच युवासेना विभाग सचिव, पश्चिम महाराष्ट्र अविनाश बलकवडे यांच्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कामाची माहिती घेऊन व त्यांना प्रेरित होऊन मुळशी तालुक्याच्या विकासासाठी पौड- अंबडवेट जिल्हा परिषद गटातील युवा कार्यकर्त्यांनी कोळवण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
यावेळी युवासेना उपतालुकाधिकारी पदी विकास खिलारी, विभाग अधिकारी पदी समीर मोढवे, उपविभाग अधिकारी अक्षय धिडे, शाखा प्रमुख सनी खिलारी, उपशाखा प्रमुख साईदास खिलारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य सागर काटकर, उपतालुका प्रमुख लहु लायगुडे, नितीन साठे, ज्येष्ठ शिवसैनिक हरी दुर्गे, नारायण धिडे, राम मोढवे, संजय ढमाले, राजाभाऊ कालेकर, बाळू निबुदे, नारायण निबुदे, संजय साठे, विभाग प्रमुख शैलेश मालपुटे, मारुती फाले, राम काळभोर, विठ्ठल लोयरे, दत्ता कालेकर, धर्मा फाले, सागर फाले, उपसरपंच पंकज धिडे, उपतालुकाधिकारी मिथुन खिलारी, विकास खिलारी, व शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




