Mukesh Khanna On Kapil Sharma | ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या विधानामुळे त्यांच्यावर टीका देखील केली जाते. नुकतेच एका मुलाखतीत त्यांनी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोवर निशाणा साधला. मुकेश खन्ना यांनी कपिलच्या शोला अश्लील म्हटले आहे. तसेच कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्यासाठी मला कधीही निमंत्रण आले नाही आणि त्याने संपर्क केला असता तरी मी नकार दिला असता, असे मुकेश खन्ना म्हणाले आहेत. मुकेश खन्ना यांनी म्हंटले की, “कपिल शर्माला काय अडचण होती जे त्याने कधी माझ्याशी संपर्क केला नाही, कदाचीत याला अहंकार म्हणता येईल. एकदा कपिलने शोमध्ये महाभारताच्या कलाकारांना बोलावलं होतं पण मला बोलावलं नव्हतं. मी ही आधीच ठरवलं होतं कि या शोमध्ये मी जाणार नाही. या शोमध्ये मला अश्लीलता दिसते. यातील बरेचसे संवादही डबल मिनींग असतात. मला त्याच्या शोमध्ये सभ्यता दिसत नाही. म्हणूनच मी या शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले,” असा खुलासा मुकेश खन्ना यांनी केला. ते पुढे म्हणाले, “मी या शोचा एक प्रोमो पहिला होता ज्यात रामायण मालिकेची टीम सहभागी झाली होती. अरुण गोविल यांनीही हजेरी लावली होती. त्यावेळी तो अरुण गोविल यांना म्हणाला कि,”सर तुम्ही बीचवर अंघोळ करत आहात आणि तेव्हाच तिथे लोकांची गर्दी जमली आणि ते ओरडले की बघा, राम सुद्धा वीआयपी अंडरवेअर घालतात. या जोकवर अरुण गोविल हसून शांत राहिले. मी असतो तर मला सहन झालं नसतं. तुम्ही कोणाला काय विचारत आहात याचं भान असू नये का? ज्याने श्रीरामाचा आदर केला नाही तो भीष्म पितामहांचा काय करेल ? त्याचवेळी मी ठरवलं की या शोमध्ये जाणार नाही.” मुकेश खन्रा यांनी एका अवॉर्ड फंक्शनमधील किस्साही यावेळी सांगितला. “कपिल शर्मा त्यांच्या बाजूला 10 मिनिटे बसला होता पण तो एका शब्दानेही बोलला नाही. इंडस्ट्रीत डिसेप्लीन खूप महत्त्वाचे आहे. कपिल चांगला विनोदी अभिनेता आहे, पण त्याच्यात खूप अहंकार आहे,” असे म्हणत त्यांनी कपिल शर्मावर निशाणा साधला. हेही वाचा: “सोनिया गांधींनी नेहरूंची नेलेली पत्रं परत द्यावीत” ; पीएम मेमोरियलची पत्राद्वारे राहुल गांधींकडे मागणी