मुकेश खन्ना पुन्हा एकदा ‘शक्तिमान’च्या रुपात; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Mukesh Khanna | अभिनेता मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तिमान’ मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली. आजही ते शक्तिमान या नावानाचे ओळखले जातात. आता तब्बल 19 वर्षांनी मुकेश खन्ना पुन्हा एकदा शक्तिमानच्या रूपात प्रेक्षकांसमोर आले आहे. मात्र वयाच्या 66 व्या वर्षी मुकेश खन्ना यांचा हा लुक पाहून नेटकऱ्यांनी त्यांची खिल्लीच उडवली आहे.
मुकेश खन्ना यांनी काही दिवसांपूर्वी ‘शक्तिमान रिटर्न्स’ ची घोषणा केली. त्यांनी काही वर्षांपूर्वीच ‘शक्तिमान’ मालिका किंवा सिनेमाच्या रुपात पुन्हा येईल असं चाहत्यांना वचन दिलं होतं. याआधी रणवीर सिंह शक्तिमानची भूमिका साकारणार अशी चर्चा होती. मात्र मुकेश खन्नांनीच त्याला विरोध केला होता. आता ते स्वत:च त्या रुपात समोर आले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, १९९७ साली आलेली ‘शक्तिमान’ लहान मुलांमध्ये लोकप्रिय मालिका होती. या मालिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्येही झाली होती. मात्र त्यांना पुन्हा या लुकमध्ये पाहणे चाहत्यांना नको झाले आहे. यावर नेटकऱ्यांनी ‘मी लहानपणी यांना बघून खूश व्हायचो आता मला लाज वाटत आहे’, ‘आमचं बालपण संपलं आणि याचं म्हातारपण अजून सुरु होत नाही’, अशा कमेंट करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे एकंदरीत हा लुक नेटकऱ्यांंना आवडलेला दिसत नाही. Mukesh Khanna |
हेही वाचा:
‘माझ्या हैद्राबादी भावा, तिथेच राहा…’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओवेसींना प्रत्युत्तर





