‘माझ्या हैद्राबादी भावा, तिथेच राहा…’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओवेसींना प्रत्युत्तर

Fadnavis on Owaisi । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी , आजकाल हे ओवेसीही इथे यायला लागले आहेत, माझ्या हैदराबादी बांधवा, तू तिथेच राहा, इकडे येऊ नको, तुझा इथे काही उद्योग नाही.” असे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित करताना ओवेसींवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना,” इथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, मला सांगायचे आहे की, “भारतातील सच्चा मुस्लिमही औरंगजेबला आपला नायक मानत नाही. औरंगजेब हा आक्रमक होता, त्याने आपल्यावर हल्ला केला होता. असे त्यांनी सांगितले. त्यासोबतच त्यांनी एक शेरोशायरी पण केली. “कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर.” असे म्हणत ओवैसींवर निशाणा साधला.
फडणवीस जिहाद आणि धर्मयुद्ध यावर मतं मागतात Fadnavis on Owaisi ।
दरम्यान, या अगोदर एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीसांवर एकेरी शब्दात टीका केली होती. याविषयी बोलताना ओवैसी यांनी, “देवेंद्र फडणवीस, तुम्ही माझ्या भाषेशी स्पर्धा करू शकत नाही, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा एकत्र बसले तरी तुम्ही माझ्या भाषेशी स्पर्धा करू शकत नाही. फडणवीस हे जिहाद आणि धार्मिक युद्धाबाबत मतं मागतात, हे विधान कायद्यानुसार आहे की विरोधात आहे, याचे उत्तर निवडणूक आयोगाला विचारायचे आहे. माझ्या नावावर जिहाद आणि धर्मयुद्धाचा बडगा उगारला जात आहे, असे ते म्हणाले. तसेच निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करू नये? फडणवीस यांनी आमदार खरेदी केल्याचा आरोपही ओवेसी यांनी केला.
‘मताच्या जिहादला धार्मिक युद्धानेच उत्तर द्यावे लागेल’ Fadnavis on Owaisi ।
छत्रपती संभाजी नगर येथील जाहीर सभेत भाजप नेते फडणवीस यांनी ओवेसींवर निशाणा साधत मत जिहादला धार्मिक युद्धाने उत्तर द्यावे लागेल, असे म्हटले होते. ते म्हणाले, ऐका ओवेसी, छत्रपती संभाजीनगरात नाव बदलू शकेल असा एकही बाप जन्माला आला नाही.





