Pune News : अभिनेत्रीला महावितरणचा झटका! वीजबिल थकल्याने फार्महाऊसचा वीजपुरवठा तोडला; बिल भरताच पुन्हा जोडणी
Pune News : लोणावळ्यातील आपल्या फार्महाऊसचे थकीत वीजबिल न भरल्याने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांना महावितरणच्या कारवाईचा सामना करावा लागला आहे.

Pune News : अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा वीजपुरवठा थकीत बिलामुळे महावितरणने २६ सप्टेंबर रोजी खंडित केला. तब्बल चार दिवसांनंतर बुधवारी (दि. ३०) तीन हजार रुपयांचे थकीत वीजबिल ऑनलाइन भरल्यानंतर महावितरणने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला. (Pune News)
लोणावळ्यातील फार्महाऊससाठी तनिषा मुखर्जी यांच्या नावावर तीन फेजची वीजजोडणी आहे. मोठ्या परिसरातील या फार्महाऊसचे मीटर प्रवेशद्वारापासून सुमारे ३०० फूट अंतरावर आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असल्याने मीटर रीडिंगसाठी व्यवस्थापकाची परवानगी घ्यावी लागते. (Pune News)
जुलैचे वीजबिल ५ ऑगस्ट रोजी भरण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे बिल तयार झाले. त्याची भरणा मुदत ४ सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर महावितरणने नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे बिल भरण्याची नोटीस पाठविली. (Pune News)
१९ सप्टेंबर रोजी नोटीसची मुदत संपल्यानंतरही स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी फार्महाऊसच्या व्यवस्थापकाकडे बिल भरण्याची विनंती केली. मात्र, बिल न भरल्याने अखेर २६ सप्टेंबर रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. (Pune News)
बुधवारी तनिषा मुखर्जी यांनी ऑनलाइन पद्धतीने तीन हजार रुपयांचे बिल भरले. त्यानंतर महावितरणने तातडीने वीजजोडणी पूर्ववत केली. थकीत वीजबिलाचा भरणा न झाल्यास नियमानुसार वीजपुरवठा खंडित केला जातो. या प्रकरणातही महावितरणने त्याच नियमानुसार कारवाई केली असून, बिल भरल्यानंतर तत्काळ वीजपुरवठा सुरू केला. (Pune News)
Pune News : महापालिका भरती गैरव्यवहारप्रकरणी राजेंद्र खेडेकरला अटक; तीन ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी





