MS Dhoni : ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात धोनी-रैनाने केला जबरदस्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल

MS Dhoni Dance Video Viral : भारतीय संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनीचे प्रत्येक वेळी नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर येत राहतात, जे चाहत्यांमध्ये झपाट्याने व्हायरल होतात. आता माहीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो खूप खास आहे. कारण तो ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
धोनी दमादम मस्त कलंदर गाण्यावर थिरकताना दिसला –
एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनी भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची बहीण साक्षीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी मसुरीला पोहोचले आहेत. या लग्न समारंभातील एका कार्यक्रमात धोनी आणि सुरेश रैना जबरदस्त डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ऋषभ पंतसह धोनी आणि रैना ‘दमादम मस्त कलंदर’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
ऋषभ पंतच्या बहिणीचे लग्न मसुरी येथे आयोजित करण्यात आले होते, जिथे धोनी त्याच्या कुटुंबासह ११ मार्च रोजी पोहोचला होता. दुसरीकडे, पंत देखील सकाळी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पोहोचला. धोनी आणि पंत यांच्यात नेहमीच एक चांगले बॉन्डिंग राहिले आणि म्हणूनच धोनी या लग्नात खास पाहुण्यांमध्ये सामील होता.
Rishabh Pant , MS Dhoni & Suresh Raina dancing together 🕺🕺😂😂 pic.twitter.com/b03FSVUvGv
— Riseup Pant (@riseup_pant17) March 11, 2025
ऋषभ पंतच्या बहिणीचे लग्न सध्या सुरू आहे आणि आज, बुधवारी, ती लग्नगाठ बांधणार आहे. तत्पूर्वी, मंगळवारी मेहंदी समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये क्रिकेट जगतातील अनेक स्टार्स उपस्थित होते.





