धनुषसोबतच्या लग्नाच्या अफवांदरम्यान मृणाल ठाकूरची पहिली पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली “मी अढळ..”

Mrunal Thakur post : अभिनेत्री मृणाल ठाकूर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार धनुषसोबत तिचे नाव जोडले जात असून, दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोघेही रिलेशनशिपमध्ये असून, १४ फेब्रुवारी २०१६ ला लग्र करणार असल्याचे बोलले जात असले तरी, याबाबत दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या चर्चा अफवा असल्याचे देखील बोलले जात आहे. या सगळ्या चर्चा सुरू असतानाच आता मृणाल ठाकूरने इंन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मृणाल ठाकूर एका बोटीवर बसून समुद्राच्या वाऱ्याचा आणि सोनेरी सूर्यप्रकाशाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. तिचे केस विस्कटलेले आहेत आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तिने पोस्टला, “जमिनीवर, चमकणारी आणि अढळ,” असे आकर्षक कॅप्शन दिले आहे. या पोस्टमधून अभिनेत्री सांगू इच्छिते की, ती शांत आहे आणि अफवांचा तिच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
सोशल मीडियावर देखील दोघांच्याही लग्नाच्या चर्चा सुरू असून त्यांच्या नात्याला अद्यापर्यंत दोघांनीही दुजारा दिलेला नाही. हिंदुस्तान टाईम्सच्या सूत्रांनी मृणाल ठाकूर आणि धनुषच्या लग्नाच्या बातम्या अफवा असल्याचे सांगत फेटाळून लावल्या आहेत. मृणालाचा फेब्रुवारीमध्ये एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या इतक्या जवळ असताना ती लग्न कसे करेल? असा प्रश्न उपस्थित केला जात असून तिचे इतर तेलुगू चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहेत.
View this post on Instagram
मृणालच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ती शेवटची अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये दिसली होती. धनुषने या चित्रपटाच्या स्क्रीनिंला हजेरी लावली होती. त्यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मृणाल ठाकूर सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत ‘दो दिवाने शहर’ या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.
हेही वाचा : “तुम्ही संविधानाचे रक्षक आहात, आम्ही तुमचे …” ; ममता बॅनर्जी यांचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आवाहन





