Actress Mrunal Thakur : अजय देवगणसोबतच्या या फ्लॅाप चित्रपटाविषयी मृणाल ठाकूरचा खुलासा म्हणाली “कोणतीही पूर्वकल्पना न देता…”
Actress Mrunal Thakur : बॅालिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने एका मुलाखतीत सन अॅाफ सरदार 2 चित्रपटातील तिची काही सीन्स कट करण्यात आल्याचा खुलासा केला आहे.

Actress Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डकैत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटगृहांमध्ये सुरू असलेल्या या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असले, तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारसे यश मिळालेले नाही. परिणामी बॅाक्स अॅाफिस चित्रपटाचे कलेक्शन धम्या गतीने सुरू आहे.
दरम्यान, मृणालने तिच्या गेल्या वर्षीच्या ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ‘प्रेमा’ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, चित्रपटातील काही अनुभव तिच्यासाठी अपेक्षेप्रमाणे नव्हते. विशेषतः तिच्या पतीची भूमिका एका खूप ज्येष्ठ अभिनेत्याने साकारली आहे, याची तिला पूर्व कल्पनाच नव्हती. Actress Mrunal Thakur
ती म्हणाली की, या गोष्टीमुळे तिचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला आणि आत्मविश्वासही काहीसा डळमळीत झाला. त्यामुळे ती या भूमिकेत पूर्णपणे प्रभावी ठरू शकली नाही, असे तिने स्पष्ट केले. मात्र, या अनुभवाबद्दल तिला कोणताही पश्चात्ताप नसल्याचेही तिने सांगितले. Actress Mrunal Thakur

Actress Mrunal Thakur : अजय देवगणसोबतच्या या फ्लॅाप चित्रपटाविषयी मृणाल ठाकूरचा खुलासा म्हणाली “कोणतीही पूर्वकल्पना न देता…”
या चित्रपटात मृणालने राबिया अख्तर ही भूमिका साकारली होती, तर तिच्या पतीची भूमिका अभिनेते चंकी पांडे यांनी केली होती.
याशिवाय, चित्रपटातील काही महत्त्वाची सीन्स कापण्यात आल्यामुळेही ती नाराज असल्याचे मृणालने सांगितले. तिच्या सावत्र मुलीची भूमिका साकारलेल्या रोशनी वालिया सोबतचा भावनिक सीन चित्रपटातून वगळण्यात आला. या सीनमध्ये त्यांच्या नात्याची भावनिक बाजू दाखवण्यात आली होती, जी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकली नाही, याबद्दल मृणालने खंत व्यक्त केली.
मृणाल ठाकूरच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ‘सन ऑफ सरदार 2’नंतर अभिनेत्री ‘दो दीवाने सहर में’ आणि ‘डकैत’मध्ये दिसली. तिचा आगामी ‘है जवानी तो इश्क होना है’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात ती वरुण धवन आणि पूजा हेगडे यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे.
तसेच अल्लू अर्जुन आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘राका’ या चित्रपटातही ती झळकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
हेही वाचा : तृषा कृष्णनच्या चेन्नईतील घराला बॉम्बची धमकी; पोलिस तपासात मोठा खुलासा





