Mrunal Thakur: धनुषसोबतच्या अफवांवर मृणाल ठाकूरची स्पष्टोक्ती, “आमच्यात फक्त मैत्री”…

Mrunal Thakur: गेल्या काही दिवसांपासून साऊथ स्टार धनुष आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांना अनेकदा एकत्र पाहिल्यानंतर नातेसंबंधाच्या अफवा पसरल्या. मात्र आता मृणालने या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मृणाल म्हणाली, “धनुष माझा फक्त चांगला मित्र आहे.” तिने या अफवांना “मजेशीर” म्हणत काहीही रोमँटिक नसल्याचं स्पष्ट केलं.
ती पुढे म्हणाली, “धनुष ‘सन ऑफ सरदार 2’च्या कार्यक्रमाला अजय देवगनच्या निमंत्रणावर आला होता. याबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नका. ”
अफवा मात्र तेव्हा वाढल्या, जेव्हा मृणाल धनुषच्या आगामी चित्रपट ‘तेरे इश्क में’च्या रॅप-अप पार्टीत दिसली आणि नंतर धनुष ‘सन ऑफ सरदार 2’च्या स्क्रीनिंगला गेला. यानंतर मृणालने धनुषच्या बहिणींना इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आणि चर्चांना आणखी जोर आला.
धनुषने पूर्वी रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केलं होतं. १८ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला असून त्यांना लिंगा आणि यात्रा असे दोन मुलगे आहेत.





