Mrunal Thakur: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतील तिच्या वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. याआधी बिपाशा बसूविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. आता तिच्या नव्या व्हिडिओला लोक अनुष्का शर्माशी जोडत आहेत. नेमकं प्रकरण काय? मृणाल ठाकूरने सांगितले की काही मोठ्या चित्रपटांसाठी तिला सुरुवातीला विचारले गेले होते. त्यात सलमान खानचा ‘सुलतान’ हाही चित्रपट होता. या चित्रपटात शेवटी अनुष्का शर्माला भूमिका मिळाली आणि चित्रपट सुपरहिट ठरला. मृणालने सांगितले की ती त्या काळी काही भूमिकांसाठी तयार नव्हती आणि म्हणूनच तिने त्या संधी नाकारल्या. तिच्या म्हणण्यानुसार, अशा भूमिका स्वीकारल्या असत्या तर ती स्वतःला हरवून बसली असती. अनुष्कावर अप्रत्यक्ष टीका? मृणाल म्हणाली, “मी सध्या फारस काम करत नाही, पण मी खूप काम केलं आहे. मला लगेच प्रसिद्धी नकोय, कारण जी गोष्ट लवकर मिळते ती लवकर निघून जाते.” या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली. अनेकांना वाटले की तिने हे वक्तव्य अनुष्का शर्मावर टोलाच म्हणून केले आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया मृणालचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. अनुष्काच्या चाहत्यांनी तिला ट्रोल करताना “स्वतःला मोठं दाखवण्यासाठी इतरांना कमी लेखणं चुकीचं आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या. तथापि, मृणालने आपल्या मुलाखतीत कुठल्याही अभिनेत्रीचे नाव थेट घेतलेले नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली असून, तिच्या वक्तव्यावर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.