‘फौजी’ चित्रपटात मृणाल ठाकूर दिसणार? अभिनेत्रीने स्वत: खुलासा करत सांगितले…

Prabhas And Mrunal Thakur | अभिनेता प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाबाबत सर्वांनाच फार उत्सुकता लागली आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटात प्रभाससोबत मृणाल ठाकूर दिसणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र मृणालने स्वत: याबाबत खुलासा केला आहे.
प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय मृणाल ठाकूर ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाचा महत्त्वाचा भाग होती. मात्र आता मृणाल ठाकूरने ‘फौजी’मधील तिच्या कास्टिंगच्या बातम्या अफवा असल्याचे सांगितले आहे. एका पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये मृणाल ठाकूरने लिहिले की, ‘माफ करा मी सगळी मजा खराब केली, पण मी या चित्रपटाचा भाग नाही.’ मृणालने आपण ‘फौजी’चा भाग नसल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.
त्यामुळे प्रभाससोबत कोणती अभिनेत्री झळकणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, प्रभासचे चाहते त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे या चित्रपटात तिची आणि प्रभासची जोडी दिसली नाही म्हणून मृणालचे चाहते निराश झाले आहेत. ‘फौजी’ हा चित्रपट हनु राघवपुडीच्या दिग्दर्शनाखाली बनवला जाणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू होऊ शकते. या प्रोजेक्टमध्ये प्रभास एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले तर, मृणाल ठाकूर ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटात अजय देवगणसोबत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली होती. या चित्रपटात अनेक स्टार्स दिसणार आहेत, सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. तर ‘फौजी’ व्यतिरिक्त प्रभास ‘कनप्पा’ आणि ‘द राजा साहेब’ मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा:





