मृणाल दुसानिसचे कमबॅक; स्टार प्रवाह वाहिनीवरून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Mrunal Dusanis | अभिनेत्री मृणाल दुसानिसने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळस्थान निर्माण केले होते.
मात्र प्रसिद्धीच्या झोतात असताना मृणाल लग्नानंतर अमेरिकेत वास्तव्यास गेली. परंतु काही महिन्यांपूर्वीच मृणाल चार वर्षांनंतर अमेरिकहून भारतात परतली. तेव्हापासून मृणालच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यातच आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
गणेशोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने ‘स्टार प्रवाह गणोशोत्सव २०२४’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ‘स्टार प्रवाह’चे काही जुने चेहरे आणि मृणाल दुसानिस पाहायला मिळाली. ‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर काही कलाकारांच्या डान्स रिहर्सलचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये अभिनेत्री मृणाल दुसानिससह ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील युवराज म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर डान्स करताना दिसला. Mrunal Dusanis |
गेल्या वर्षी स्टार प्रवाहच्या गणेशोत्सव सोहळ्यात ईशा केसकर दिसली होती. त्यामुळे ईशा स्टार प्रवाहवर पदार्पण करत असल्याच्या चर्चा रंगलेल्या. त्यानंतर काही दिवसातच तिच्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा प्रोमो व्हायरल होऊ लागला. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात मृणालने उपस्थिती लावल्यामुळे मृणाल येत्या नवीन मालिकेत पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. १ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ कार्यक्रम प्रसारित होणार आहे. Mrunal Dusanis |
मृणालच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, झी मराठीवरील माझ्या प्रियाला प्रित कळेना या मालिकेतून तिने दमदार पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘तू तिथे मी’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘हे मन बावरे’ या मालिका तिने केल्या. याशिवाय ‘श्रीमंत दामोदर पंत’ या सिनेमातही ती भरत जाधवसोबत दिसली होती. Mrunal Dusanis |
हेही वाचा:
वाहने थांबवली, ओळख विचारली अन् 23 जणांना गोळ्या घातल्या ; पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला





