MPSC Exam : परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी ‘संतप्त’; पुण्यात ‘रास्ता रोको’

Updated On:

पुणे – येत्या रविवारी (ता. 14) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा होणार होती. मात्र, ऐनवेळी एमपीएससीने परीपत्रक काढून अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकल्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पुण्यातील विद्यार्थी संतप्त झाले असून नवी पेठ येथे रास्ता रोको करून सरकारविरोधी घोषणा देत आहेत.

एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी अलका चौकातून सिंहगड कडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी अडवला. पोलीसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असला तरी, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांनी रस्ता अडवून शासनाच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसताहेत.

‘आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहोत. अभ्यासासाठी पुण्यात आहोत. मात्र, आयोगाने परीक्षांची तारीख वारंवार पुढे ढकलल्याने आमचे आर्थिक आणि वेळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं चुकीचे आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलावा. परीक्षेच्या फक्त तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकत नाही.’, अशी प्रतिक्रिया एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.

आणखी संबंधित बातम्या

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस