MPSC 2026 : एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर! राज्यसेवा, गट-ब, गट-क परीक्षा कधी होणार..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) २०२६ मध्ये घेणार विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये राज्यसेवा, वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा, अन्न व औषध प्रशासन सेवा अशा महत्त्वाच्या परीक्षांचा समावेश आहे.वेळापत्रकानुसार, ५ ते ९ मे २०२६ दरम्यान महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा, दि. १६ मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा होणार आहे. त्यांचे निकाल ऑगस्ट २०२६ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
तसेच, १७ मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ होणार असून, याचा निकाल सप्टेंबर २०२६ मध्ये प्रसिद्ध होईल. ७ जून २०२६ रोजी गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ होणार असून, याचाही निकाल सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे.दरम्यान, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे २०२६ रोजी होईल. राज्यसेवा मुख्य परीक्षा ३ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होतील.
त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा होणार आहेत. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन सेवा आणि निरीक्षक (वैधमापन शास्त्र) मुख्य परीक्षा होणार आहे. या शिवाय २६ ते ३० डिसेंबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा होणार असून, एप्रिल २०२७ मध्ये निकाल जाहीर केला होईल. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षांचा तपशील स्वतंत्रपणे घोषित होणार आहे.





