MPL 2024 : रत्नागिरी जेट्स संघाचा विजयाचा चौकार…

Maharashtra Premier League 2024 (Match No 11) :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात सत्यजीत बच्छाव(४-२४ व नाबाद १७) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने ४एस पुणेरी बाप्पा संघाचा ४ गडी राखून पराभव करत सलग चौथा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले.
पुणेरी बाप्पा संघावर शानदार विजय मिळवत रत्नागिरी जेट्स संघाने एमपीएल 2024 गुणतालिकेत आपला सलग चौथा विजय नोंदवला. याविजयासोबत त्यांनी गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम ठेवले. #MPL #MahaCricket #MPL2024 #MCA #म #मराठी pic.twitter.com/ICgUFANY1e
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) June 8, 2024
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जेट्सकडून सत्यजीत बच्छाव(४-२४), विजय पावले(२-२५), प्रदीप दाढे(१-१८), योगेश चव्हाण(१-२६)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा डाव १९.४ षटकात सर्वबाद १४५धावांवर संपुष्टात आला.
Bachhav’s 𝟒/𝟐𝟒 gets a well deserving Player of the Match 👏
Truly 𝘢 𝘯𝘪𝘨𝘩𝘵 𝘵𝘰 𝘳𝘦𝘮𝘦𝘮𝘣𝘦𝘳 for Ratnagiri Jets ✨@MahaCricket@JioCinema@Sports18@RatnagiriJets#MaharashtraPremierLeague2024 #MPL2024 #ThisIsMahaCricket #MaharashtraCricket #T20Cricket… pic.twitter.com/v1p5znyDeK
— MPLT20Tournament (@mpltournament) June 7, 2024
पुणेरी बाप्पा संघाने आज सलामीच्या जोडीत बदल केला होता. पण तो यशस्वी ठरला नाही. नील गांधी ७ धावात तंबूत परतला. पवन शहाने आक्रमक खेळी करत १९चेंडूत ५चौकारांसह ३२धावा, तर यश क्षीरसागरने २९चेंडूत २४धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २८चेंडूत ४२धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यावर कर्णधार ऋतुराज गायकवाडने १५चेंडूत १चौकार व १षटकाराच्या मदतीने २९धावा केल्या.
MPL 2024 : राहुल त्रिपाठीची झंझावती अर्धशतकी खेळी, पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचा पहिला विजय…
उत्तरात रत्नागिरी जेट्स संघाने १९.४ षटकांत ६बाद १४८धावा करून पूर्ण केले. क्रिश शहापूरकर(१३धावा) व धीरज फटांगरे(२५धावा) या सलामीच्या जोडीने ३२चेंडूत ३५धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीचे फलदांज बाद झाल्यावर कर्णधार अझीम काझीने २८चेंडूत २चौकाराच्या मदतीने ३१धावांची संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. रत्नागिरी जेट्सला विजयासाठी ३० चेंडूत ५४ धावांची आवश्यकता होती. निखिल नाईकने २२चेंडूत ३चौकारांसह नाबाद २८धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक
४एस पुणेरी बाप्पा : १९.४ षटकांत सर्वबाद १४४ (पवन शहा ३२, ऋतुराज गायकवाड २९, यश क्षीरसागर २४; सत्यजीत बच्छाव ४-२४, विजय पावले २-२५) पराभुत वि.रत्नागिरी जेट्स: १९.४ षटकांत ६ बाद १४८ (अझीम काझी ३१, निखिल नाईक नाबाद २४, धीरज फटांगरे २५; पियुश साळवी २-१९, रोशन वाघसरे २-१५); सामनावीर – सत्यजीत बच्छाव.





