MPL 2024 : सिद्धेश वीरची अष्टपैलू कामगिरी, रायगड रॉयल्सचा छ. संभाजी किंग्सवर दमदार विजय…

Maharashtra Premier League 2024 (Match No 17) :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत अकराव्या दिवशी पहिल्या लढतीत सिद्धेश वीर(६१धावा व १-१९) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा ३ गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला.
सुनिल यादवची भेदक गोलंदाजी, सिद्धेश वीर आणि मेहुल पटेलच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने छ. संभाजी किंग्स संघाला पराभूत केले. #MPL #MPL2024 #MahaCricket #MCA pic.twitter.com/Gv6Jvqen2y
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) June 11, 2024
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओम भोसले व मुर्तझा ट्रंकवाला या सलामीच्या जोडीने ३२चेंडूत ५३ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. ओम भोसलेने ४८चेंडूत नाबाद ८१धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने ११चौकार व १ षटकार मारले. त्याला मुर्तझा ट्रंकवालाने ३९चेंडूत ४चौकार व ३ षटकाराच्या मदतीने ४४धावांची खेळी करून साथ दिली.
मुर्तझा ट्रंकवालाची झंझावती खेळी सिद्धेश वीरने झेल बाद करून संपुष्टात आणली. त्यानंतर, मात्र रायगड रॉयल्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत छत्रपती संभाजी किंग्सच्या फलंदाजांना झटपट तंबूत पाठवले. ओमकार खाटपे(१), दिग्विजय पाटील(३), दिग्विजय जाधव(८), सौरभ सिंग(१), शामसुझमा काझी(२), स्वराज चव्हाण(२), आनंद ठेंगे(०) हे झटपट बाद झाले. रायगड रॉयल्सकडून सुनील यादव(३-२४), सिद्धेश वीर(१-१९), विकी ओस्तवाल(१-१५)यांनी सुरेख गोलंदाजी करून छत्रपती संभाजी किंग्स संघाला १४६धावावर रोखले.
विजयासाठी १४६ धावांचा पाठलाग करताना रायगड रॉयल्स संघाने १९.४षटकात ७ बाद १४७ धावा करून पूर्ण केले. सलामीचा फलंदाज सिद्धेश वीरने ५३चेंडूत ३चौकार, ३ षटकार मारत ६१धावांची खेळी केली. प्रणय सिंगने स्पर्धेतील महागडा खेळाडू ठरलेल्या नौशाद शेखला ११ धावांवर त्रिफळा बाद केले. त्यानंतर सिद्धेश वीरने मेहुल पटेलच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी ४५चेंडूत ५०धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. मेहुल पटेलने ३५चेंडूत ४२ धावा केल्या. यात त्याने ३चौकार व १षटकार मारला. त्यानंतर ऋषभ राठोडने २० धावा काढून संघाचा विजय सुकर केला.
MPL 2024 : थरारक सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचा विजय, रत्नागिरी जेट्सला 2 धावांनी केलं पराभूत…
संक्षिप्त धावफलक – छत्रपती संभाजी किंग्स : २० षटकात ८ बाद १४६ धावा. (ओम भोसले नाबाद ८१, मुर्तझा ट्रंकवाला ४४, सुनील यादव ३-२४, सिद्धेश वीर १-१९, विकी ओस्तवाल १-१५) पराभुत वि. रायगड रॉयल्स : १९.४ षटकात ७ बाद १४७ धावा. (सिद्धेश वीर ६१, मेहुल पटेल ४२, ऋषभ राठोड २०, नौशाद शेख ११, प्रणय सिंग ३-३०,स्वराज चव्हाण २-२१, आनंद ठेंगे २-३६).





