MPL 2024 : पीबीजी कोल्हापूर टस्कर्सची विजयी मालिका कायम…

Maharashtra Premier League 2024 (Match 26) :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) स्पर्धेत सोळाव्या दिवशी दुसऱ्या लढतीत फिरकीपटू अथर्व डाकवे (४-१०) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स (PBG kolhapur Tuskers) संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत आपली विजयी मालिका कायम राखली. या विजयाबरोबरच पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने ५ विजयासह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार राहुल त्रिपाठीने घेतलेला निर्णय कोल्हापूर टस्कर्सच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्सच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत छत्रपती संभाजी किंग्सला १९.५ षटकात सर्वबाद १२६धावावर रोखले. कोल्हापूर टस्कर्सकडून फिरकीपटू अथर्व डाकवेने १०धावात ४ गडी बाद केले. उमर शहा(२-२९)ने दोन बळी, तर श्रीकांत मुंढे १-१९, श्रेयस चव्हाण १-२१)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सलामीचे फलंदाज ओम भोसले(१९धावा) व मुर्तझा ट्रंकवाला(११धावा) हे झटपट बाद झाले. त्यानंतर ओमकार खाटपेने २०चेंडूत २६ धावांची खेळी करून धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण अथर्व डाकवेने तओमकारला बाद करून संघाला तिसरा धक्का दिला. मधल्या फळीतील फलंदाज दिग्विजय पाटील(६), सौरभ नवले(७), हर्षल काटे(७) हे देखील एकापाठोपाठ बाद झाल्याने छत्रपती संभाजी किंग्स संघ ६ बाद ८९ असा अडचणीत होता. सौरभ सिंगने २६ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या वाढवली.
𝐀𝐧 𝐞𝐚𝐬𝐲 𝐰𝐢𝐧 𝐟𝐨𝐫 𝐏𝐁𝐆 𝐊𝐨𝐥𝐡𝐚𝐩𝐮𝐫 𝐓𝐮𝐬𝐤𝐞𝐫𝐬 🙌
They win by 7 wickets and stay competitive to secure a spot in the playoffs 👏#MaharashtraPremiereLeague2024 #MPL2024 #ThisIsMahaCricket #T20Cricket #PBGKolhapurTuskers pic.twitter.com/E7rA4aMYKz
— MPLT20Tournament (@mpltournament) June 16, 2024
१०८ धावांचे आव्हान पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने १२.४ षटकात ३ बाद १२७ धावा करून पूर्ण केले. अंकित बावणे व अनिकेत पोरवाल या सलामी जोडीने ३०चेंडूत ४५ धावाची सलामी दिली. अंकित बावणेने २६ चेंडूत ६चौकारासह ३९धावा, तर अनिकेत पोरवालने २१ धावा केल्या. त्यानंतर सिद्धार्थ म्हात्रेने १३ चेंडूत नाबाद ३४ अफलातून फलंदाजी करताना संघाचा विजय सुकर केला. सचिन धसने नाबाद १२ धावा काढून दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी २४ चेंडूत ४४ धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक – छत्रपती संभाजी किंग्स : १९.५ षटकात सर्वबाद १२६ धावा. (ओमकार खाटपे २६, सौरभ सिंग २६, ओम भोसले १९, मुर्तझा ट्रंकवाला ११, आनंद ठेंगे नाबाद १३, अथर्व डाकवे ४-१०, उमर शहा २-२९, श्रीकांत मुंढे १-१९, श्रेयस चव्हाण १-२१) पराभुत वि. पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स : १२.४ षटकात ३ बाद १२७ धावा. (अंकित बावणे ३९, अनिकेत पोरवाल २१, राहुल त्रिपाठी १६, सिद्धार्थ म्हात्रे नाबाद ३४, सचिन धस नाबाद १२, हितेश वाळुंज १-१८, शामसुजमा काझी १-१९). सामनावीर – अथर्व डाकवे.





