MPL 2024 : छत्रपती संभाजी किंग्स संघाची विजयी सलामी, रायगड रॉयल्सला केलं पराभूत…

Maharashtra Premier League 2024 :- महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) स्पर्धेत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात छत्रपती संभाजी किंग्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा ३४ धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६बाद २०३धावा केल्या. २००धावांचा टप्पा पार करणारा छत्रपती संभाजी किंग्स हा या मौसमातील पहिला संघ ठरला.
दिग्विजय पाटील व ओम भोसले (५२ धावा)यांनी चौथ्या गड्यासाठी ३३ चेंडूत ६० धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या मजबूत केली. पण ओम भोसलेने मारलेला चेंडू निखिल कदमने फॉलो थ्रू मध्ये अडवला व चपळाईने क्षेत्ररक्षण करून दिग्विजयला बाद केले. ओमच्या अर्धशतकाने छत्रपती संभाजी किंग्स संघाने २० षटकात ६बाद २०३धावा अशी भक्कम धावसंख्या उभारली. २०३ धावांचे आव्हान रायगड रॉयल्स संघ पेलू शकला नाही. त्यांचा डाव २० षटकात ९बाद १७०धावावर संपुष्टात आला.
MPL 2024 : कोल्हापूर टस्कर्सच्या कर्णधारपदी राहुल त्रिपाठी, संघमालक पुनीत बालन यांची घोषणा…
संक्षिप्त धावफलक – छत्रपती संभाजी किंग्स – २० षटकात ६बाद २०३धावा. (दिग्विजय पाटील ६३, ओम भोसले ५२, ओंकार खाटपे ४९, मुर्तझा ट्रंकवाला १०, विकी ओस्तवाल १-२५, ओमकार राजपूत १-३५, मनोज इंगळे १-३७, निखिल कदम १-३९) वि. वि. रायगड रॉयल्स – २० षटकात ९बाद १७०धावा. (सिद्धेश वीर ३५, ऋषभ राठोड ३५, विकी ओस्तवाल १४, नौशाद शेख १३, शामसुझमा काझी ३-३४, हितेश वाळुंज २-२९, आनंद ठेंगे २-३१, प्रणय सिंग १-२९, राजवर्धन हंगरगेकर १-३८); सामनावीर – ओम भोसले.





