खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतले शनि दर्शन; देवाला तेलाचा अभिषेक घालून पूजा
Updated On:

नेवासा – शनि अमावस्येनिमित्त शनिवारी (दि. २९) श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली यांनी शनिदेवाचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यांनी चौथऱ्यावर शनिदेवाला तेलाचा अभिषेक घालून पूजा केली. यावेळी नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी त्यांचं स्वागत करत सत्कार केला.
या प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर (काका) शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसरडा, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, प्रताप चिंधे, राजेंद्र मते, सतीश कर्डिले, प्रदीपभाऊ ढोकणे, दत्तात्रेय पोटे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिदर्शनासाठी भाविकांचीही गर्दी जमली होती.





