Nagar : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतले शनीदर्शन

शनी शिंगणापूर : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिशिंगणापूर येथे कुटुंबीयासमवेत शनि महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, देवस्थानचे विश्वस्त पोपटराव शेटे, पोलीस पाटील अॅड. सयाराम पाटील बानकर, भारतीय जनता पक्षाचे सुभाष पवार, सतीश कर्डिले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवराज सिंह चौहान हे दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थानला येत असतात. यावेळी ते कुटुंबीयासमवेत आले होते. शनिशिंगणापूरला येऊन अभिषेक व शनी चौथ्यावर जाऊन शनि महाराजांचे दर्शन घेतले. शिवराज सिंह चौहान हे गेल्या 18 वर्षांपासून न चुकता वर्षाच्या सुरुवातीलाच शनिशिंगणापूरला येत असतात. यावेळी नियोजित कार्यक्रमामुळे ते एक दिवस उशिराने आले.
त्यांच्या समवेत पत्नी, चिरंजीव कुणाल तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते. शनी महाराजांचे दर्शन घेऊन मनाला समाधान मिळते, हे त्यांनी सांगितले. आपण न चुकता वर्षाच्या सुरुवातीलाच शिर्डी येथे मुक्कामी येऊन दुसऱ्या दिवशी शनिशिंगणापूरला येत असतो, मात्र नियोजित कार्यक्रमामुळे यावर्षी एक दिवस उशिरा यावे लागते. यावेळी देवस्थानच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बानकर, पोपटराव शेटे, अॅड. साईराम बांधकर यांनी त्यांचा शनि प्रतिम, श्रीफळ देऊन सन्मान केला
वडा-पावचा घेतला आस्वाद
सन २००० सालापासून केंद्रीय कृषिमंत्री चौहान हे दरवर्षी न चुकता एक जानेवारीला शनिशिंगणापूरला येतात. शिर्डीला जाताना चौहान परिवाराने अशोका वडापावच्या हातगाडीवर थांबून वडा-पावचा आस्वाद घेतला. अशोक कुसळकर व संदीप कुसळकर यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपसरपंच नंदिनी संदीप कुसळकर, अंजली कुसळकर, कल्पना कुसळकर, मोनिका कुसळकर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्याचे सहपत्नीक औक्षण केले. यावेळी कुसळकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.





