नगरिकांच्या मदतीला धावले खासदार लंके
Updated On:

नगर – नगर शहरात झालेल्या धो-धो पावसाने शहरातील नारहरी नगर आणि गुलमोहर रोड येथील नागरिकांना घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे या पावसाने मनपाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्य़ान या घटनेची माहिती मिळताच खासदार नीलेश लंके यांने तत्काळ नगर येथे घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.व मनपा प्रशासनास तत्काळ उपाययोजन करण्याचे आदेश दिले. यावेळी माजी नगरसेवक योगिराज गाडे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





