संगीत विश्वावर शोककळा..! ए.आर. रहमान ते राहुल देशपांडेंपर्यंत सर्वांनीच वाहिली श्रद्धांजली

मुंबई – आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या ९३ वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला.
लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूरच्या पंडित दीनदयाळ मंगेशकर या परिवारात झाला होता. दरम्यान, लतादीदींच्या जण्याने अवघ्या संगीतक्षेत्रावरही शोककळा पसरली आहे. राहुल देशपांडेंपासून ते एआर रहमानपर्यंत अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
– राहुल देशपांडे
View this post on Instagram
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर “आम्ही पोरके झालो…’ असं म्हंटलं आहे.
– ए आर रहमान
Love, respect and prayers 🌹 @mangeshkarlata pic.twitter.com/PpJb1AdUdc
— A.R.Rahman (@arrahman) February 6, 2022
ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमान यांनी देखील लता मंगेशकर यांच्यासोबतच फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
– कुमार सानू
हिंदीतील प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांनी सुद्धा आपली दुःख व्यक्त करत “माझ्यासाठी त्या माँ सरस्वती होत्या..! असं म्हंटल.
– नेहा कक्कर
Meri Awaz Hi Pehchaan Hai….
Lata Mangeshkar Ji jaisa Koi Nahin hoga kabhi…. 😔 pic.twitter.com/du4dvKPAnE— Neha Kakkar (@iAmNehaKakkar) February 6, 2022
तर गायिका नेहा कक्कर हिने “त्यांच्यासारखं दुसरं कुणीच नाही! अशी पोस्ट केली आहे.





