मौनी रॉयचा नवा लुक; ट्रोलर्सने साधला निशाणा

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तिला युजर्सने पुन्हा शस्त्रक्रिया आणि बोटॉक्स केल्याबद्दल ट्रोल केले आहे. याआधी देखील तिने शस्त्रक्रिया आणि बोटॉक्स
केल्याने तिच्यावर टीका करण्यात आली होती. आता पुन्हा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
अलिकडेच तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पांढऱ्या सॅटिन मिनी ड्रेसमध्ये दिसली. मात्र यात तिच्या लुकमध्ये बदल दिसून आला.
त्यावरून ‘सर्जरीचं दुकान, ‘कूल बनण्याच्या मागे, वाईट लूक फक्त बोटॉक्समुळे आला. आता तिचे नाव बोटॉक्स गर्ल आहे,’ असे म्हणत तिच्यावर टीका केली आहे. तर काहींना मौनी रॉयच्या लूकचे कौतुक केले आहे. ‘बेबी डॉल’, ‘खूप सुंदर,’ असे काहींनी म्हंटले आहे. Mouni Roy |
View this post on Instagram
मौनी रॉयला तिला ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले होते तेव्हा ‘मी अशा कमेंट्सकडे लक्ष देत नाही. जर तुम्ही पडद्यामागे लपून इतरांना ट्रोल करत असाल आणि तुम्हाला त्यात आनंद मिळत असेल तर तसेच राहा,’ असे म्हणत तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते.
सध्या मौनी रॉय तिच्या आगामी सिनेमा ‘द भूतनी’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. Mouni Roy |
हेही वाचा :





