Mouni Roy : काय केलं चेहऱ्याचं? मौनी रॉय ट्रोलर्सना भिडली, थेट म्हणाली….

Mouni Roy : ‘नागिन’ फेम अभिनेत्री ‘मौनी रॉय’ ही सध्या तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे चांगलीच चर्चेत आहे, पण त्याचबरोबर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. प्लास्टिक सर्जरी, ओठांचा बदल, कपाळावर बोटॉक्स… अशा अनेक संशयित बाबींवर नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर टीका केली. मात्र मौनीने त्यावर अत्यंत धैर्याने आणि आत्मविश्वासाने उत्तर दिलं आहे.
एका मुलाखतीत अशा ट्रोलिंगबद्दल विचारलं असता मौनी म्हणाली, “प्रत्येकाला त्यांचं काम करू द्या. मी अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. जर कोणी पडद्यामागे लपून इतरांना ट्रोल करत असेल आणि त्यात त्यांना आनंद मिळत असेल, तर तेही त्यांचं कामच आहे. मला काही फरक पडत नाही.” असं अभिनेत्री म्हणाली.
View this post on Instagram
अलीकडेच मौनीने तिच्या इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती, ज्यामध्ये ती स्ट्रॅपलेस ब्लॅक गाऊनमध्ये ‘हिट द बकेट’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर नजरेस पडली. तिचा नव्या हेअरस्टाईलसोबत लूकही चांगलाच चर्चेत आला.
मात्र अनेकांनी तिच्या चेहऱ्यात झालेल्या बदलांकडे बोट दाखवत पुन्हा सर्जरीचा संशय व्यक्त केला. तिच्या या फोटोवर देखील नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. सध्या अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मौनी आगामी हॉरर अॅक्शन-कॉमेडी “द भूतनी” मध्ये ‘मोहब्बत’ नावाच्या एका भयानक भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. “द भूतनी” साठी तिने स्वतःचे सर्व स्टंट केले.
याबद्दल बोलताना मौनी म्हणाली, “मी चित्रपटातील माझे सर्व स्टंट स्वतः केले आहेत. सुदैवाने, मी प्रशिक्षित आहे आणि माझ्या मागील कामामुळे मला हार्नेस घालण्याची आणि स्टंट करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे ही एक सोपी प्रक्रिया होती.
मला वाटतं स्टंट हा कोरिओग्राफीचा एक प्रकार आहे आणि मी स्वतःला एक चांगली डान्सर आणि लवकर शिकणारी व्यक्ती मानते. ‘नागिन’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या चित्रीकरणामुळे मला ‘द भूतनी’ साठी आवश्यक असलेले सर्व प्रशिक्षण मिळाले. हे सांगायला नकोच की चित्रपटात एक उत्तम स्टंट टीम होती आणि माझे सहकलाकारही खूप छान होते.” असं मौनी यावेळी म्हणाली.





