Mouni Roy vs Disha Patani : दोघींच्या मैत्रीची चर्चा, पण पैशात कोण भारी? ‘मौनी-दिशा’च्या संपत्तीचा आकडा ऐकून उडतील होश !

Mouni Roy vs Disha Patani : अभिनेत्री मौनी रॉय आणि दिशा पटानी या दोघी त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्यांच्या घट्ट मैत्रीमुळे चर्चेत असतात. काही वर्षांतच दोघी इतक्या जवळच्या मैत्रिणी बनल्या आहेत की त्या अनेकदा एकत्र सुट्ट्या घालवताना आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होताना दिसतात.
नुकत्याच दिशाने मौनीच्या घरी दिवाळीचा जल्लोष साजरा केला, जिथे दोघी पारंपरिक लुकमध्ये एकदम ग्लॅमरस दिसल्या. आज आपण जाणून घेऊ या दोन्ही अभिनेत्रींची नेटवर्थ आणि त्यांच्या आलिशान जीवनशैलीबद्दल बोलणार आहोत…
मौनी रॉय किती श्रीमंत आहे?
View this post on Instagram
टीव्ही इंडस्ट्रीतून करिअरची सुरुवात करणारी मौनी रॉय आता बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. अक्षय कुमारपासून रणबीर कपूरपर्यंत अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. शेवटची ती संजय दत्तसोबत ‘द भूतनी’ या चित्रपटात दिसली होती.
नेटवर्थ: मौनी रॉयची एकूण संपत्ती सुमारे ₹41 कोटी आहे.
कमाईचे स्रोत: अभिनयासोबतच ती ब्रँड एंडोर्समेंट, सोशल मीडिया आणि टीव्ही रिअॅलिटी शोमधून मोठी कमाई करते.
घर: मुंबईच्या बांद्रा येथील तिचं आलिशान अपार्टमेंट कोट्यवधी रुपयांच्या किंमतीचं आहे.
गाड्या: मौनीकडे Mercedes GLS 350D, Mercedes-Benz E-Class, BMW 5 Series, आणि Range Rover Velar अशा लक्झरी गाड्यांचा ताफा आहे.
दिशा पटानीची संपत्ती आणि लक्झरी लाइफ :
View this post on Instagram
दिशा पटानीने आपला चित्रपट प्रवास सुशांत सिंह राजपूत सोबतच्या ‘एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ पासून सुरू केला. मात्र, तिला खरी लोकप्रियता ‘बागी 2’ या चित्रपटामुळे मिळाली. त्यानंतर तिने ‘भारत’, ‘बागी 3’, ‘कंगुवा’ आणि ‘योद्धा’ यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.
नेटवर्थ: दिशाची एकूण संपत्ती सुमारे ₹75 कोटी आहे.
कमाईचे स्रोत: चित्रपटांव्यतिरिक्त ती ब्रँड एंडोर्समेंट, मॉडेलिंग आणि सोशल मीडियावरून मोठी कमाई करते.
फीस: दिशा एका चित्रपटासाठी ₹5 ते ₹7 कोटी इतका मोबदला घेत असल्याचे सांगितले जाते.
गाड्या: तिच्याकडे Land Rover Range Rover Autobiography LWB, Mercedes-Benz S450, आणि BMW 7-Series सारख्या लक्झरी कार आहेत.
दोन्ही अभिनेत्री केवळ ग्लॅमर आणि सौंदर्यामुळेच नाही, तर मेहनत, सातत्य आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीमुळे चाहत्यांच्या हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही अभिनेत्रींचे मोठे फॉलोवर्स आहेत.





