Mouni Roy : मौनी रॉयच्या घटस्फोटामागचं खरं कारण समोर; पती सूरज अभिनेत्रीला देत होता अश्या पद्धतीचा त्रास…
हे लक्षात घेण्यासारखे आहे की चार वर्षांपूर्वी २०२२ मध्ये मौनी आणि सूरजने गोव्यात मोठ्या थाटात लग्न केले होते.

Mouni Roy : छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध मिळवलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चित आली आहे. तिचा पती सूरज नंबियारसोबत घटस्फोट घेतल्याची चर्चा मनोरंजन विश्वात सुरू आहे.
यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. ही चर्चा होण्यामागेचे कारण म्हणजे दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले. त्यानंतर मौनीने सूरजसोबतचे तिच्या लग्नाचे फोटोदेखील डिलीट केले आहेत. नंतर सूरजनेही त्याचे अकाउंट डिलीट केले.
मात्र, घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, या दोघांचं नेमकं कुठे बिनसलं? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या हवाल्याने मौनी आणि सूरजच्या घटस्फोटामागचं नेमकं कारण सांगितलं गेलं आहे.
सूरजने मौनीची फसवणूक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूरजने मौनी रॉयची नात्यात फसवणूक केली आणि त्याने तिच्या पैशांचाही वापर केला, असं त्यात म्हटलं गेलं आहे. म्हणूनच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असून गेल्या काही दिवसांपासून ते वेगवेगळे राहत आहेत.
मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सूरजसोबतचे सर्व फोटोसुद्धा काढून टाकले आहेत. तर सूरजने या चर्चांदरम्यान थेट त्याच इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केला आहे. मात्र, आता या सर्व प्रकरणावर मौनी काय प्रतिक्रिया देणार हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे.
View this post on Instagram
मौनी आणि सूरजचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले होते…
हे लक्षात घेण्यासारखे आहे की चार वर्षांपूर्वी २०२२ मध्ये मौनी आणि सूरजने गोव्यात मोठ्या थाटात लग्न केले होते. त्यांनी मल्याळी आणि बंगाली दोन्ही परंपरेनुसार लग्न केले.
आगामी काही दिवसांमध्ये अभिनेत्री मौनी रॉय नवीन चित्रपटात झळकणार आहे. मधुर भांडारकर यांच्या ‘द वाइव्ह्स’ या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
तिच्यासोबत या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, रेजिना कॅसांड्रा, राहुल भट्ट, सौरभ सचदेवा, अर्जन बाजवा आणि फ्रेडी दारूवाला या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
याव्यतिरिक्त, डेव्हिड धवन यांच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ या रोमँटिक चित्रपटाच देखील मौनी रॅाय दिसणार आहे. वरुण धवन, पूजा हेगडे, कुब्रा सैत, मनीष पॉल, रोहित सराफ, राजीव खंडेलवाल, नितीश निर्मल आणि श्रीलीला या कलाकारांच्या देखील भूमिका आहेत.






