दिशा पटानीच्या वाढदिवसानिमित्ताने मौनी रॅायने खास फोटो केले शेअर; शुभेच्छा देत म्हणाली….

Mouni Roy : बॅालीवूड इंडस्ट्रीत आपल्या हॅाट अंदाजासाठी अभिनेत्री दिशा पटानी ओळखली जाते. आज तिचा ३२ वा वाढिदवस असून, अनेक सेलिब्रेटी आणि तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री मौनी रॅाय हिने देखील दिशाला शुभेच्छा देत तिला आपली छोटी बहिण म्हटले आहे.
मौनी रॅाय हिने दिशासोबतेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री मौनी रॅायने एक पोस्ट शेअर केली आहे. “माझ्या सर्वात सुंदर लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझी सर्वात चांगली मैत्रिण मला तुझ्यातील सर्व गुण आवडतात, अशी पोस्ट तिने केली आहे.
View this post on Instagram
दररोज माझी काळजी घेतल्याबद्दल माझी चांगली मैत्रिण असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. मनापासून प्रेम करणाऱ्या हृदयाला जे हवे आहे ते सर्व तुला द्यावे, अशी प्रार्थना असे देखील मौनी रॅायने पोस्टमध्ये म्हटले आहे. दिशा पटानी आणि मौनी रॉय या चांगल्या मैत्रीणी असून दोघेही कामातून वेळ काढत फिरायला जात असतात. तसेच दिशा आणि मौनी या दोघेही एकमेकांना बहिणी मानतात. हे अनेकदा त्यांनी केलेल्या कृतीतून दिसून आले आहे.
हेही वाचा: Air India Plane Crash : पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा विमान अपघातात मृत्यू; कुटुंबीय अहमदाबादला रवाना





