मौनी रॉयने पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी? नव्या गाण्यातील लुकमुळे होतेयं ट्रोल

Actress Mouni Roy Troll | अभिनेत्री मौनी रॉय तिच्या बोल्ड आणि हॉट लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो चाहत्यांच्या देखील चांगलेच पसंतीस पडतात. नुकताच मौनीचा अरबी गायक डिस्टिंक्टसोबत एक नवीन म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे. यातील तिचा लुक पाहून मौनी रॉयने पुन्हा प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून आता तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
मौनी रॉयच्या या नव्या गाण्याचे नाव ‘जालिमा’ असे आहे. यातील मौनीचा बदललेला लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही. त्यामुळे तिने पुन्हा प्लास्टिक सर्जरी केल्याच्या अफवा सुरू झाली आहे. नेटिझन्सनी मौनीला तिच्या लूकसाठी ट्रोल केले आणि म्युझिक व्हिडिओमधील डान्सवरूनही तिच्यावर टीका केली आहे. Actress Mouni Roy Troll |
या गाण्यात मौनीचे डोळे आणि चेहरा काहीसा बदललेला दिसत आहे. यावरून एका नेटकऱ्याने लिहिले की, “मौनीपेक्षा नोराला कास्ट करायला हवं होतं,” दुसऱ्याने लिहिले की, “खूप वाईट दिसत आहे.” आणखी एका यूजरने लिहिले, “मौनीच्या डोळ्यांना काय झाले? तिने डोळ्यांची प्लास्टिक सर्जरी केली का?”
मौनीच्या या गाण्याला अरबी टच देण्यात आला आहे. डिस्टिंक्ट आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. मौनीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 2022 च्या ब्रह्मास्त्र भाग 1: शिवा मध्ये तिने खलनायकाची भूमिका केली होती. यातील तिच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले होते.
हेही वाचा:
एक्झिट पोलवर प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया ; काय म्हणाले वाचा सविस्तर ?





