Mouni Roy: दिशा पाटणीची आठवण येताच मौनी रॉय भावूक; खास पोस्ट शेअर करून काही वेळातच केली डिलीट
Mouni Roy मौनी आणि दिशा यांना बॉलिवूडमधील बेस्ट फ्रेंड्स मानलं जातं. दोघी अनेकदा एकमेकींसोबत वेळ घालवताना दिसतात. त्यामुळे मौनीने दिशाला “छोटी बहिण” म्हणत केलेली पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. काही जणांनी या मैत्रीचे कौतुक केले, तर काहींना पोस्ट अचानक डिलीट केल्यामुळे आश्चर्य वाटले.

Mouni Roy: अभिनेत्री मौनी रॉय आणि दिशा पाटणी या दोघींची मैत्री बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत असते. अनेक पार्टी, इव्हेंट आणि सुट्ट्यांमध्ये या दोघी एकत्र दिसतात. सोशल मीडियावरही त्या एकमेकींसाठी प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता पुन्हा एकदा मौनी रॉयने दिशासाठी केलेल्या एका खास पोस्टमुळे दोघी चर्चेत आल्या आहेत. मात्र, ही पोस्ट काही वेळातच डिलीट करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दिशा पाटणीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत तिने अतिशय भावूक संदेश लिहिला होता. “माझ्या छोट्या बहिणीची खूप आठवण येतेय, लवकर परत ये,” असे तिने लिहिले होते. यामध्ये तिने दिशा पाटणीला टॅगही केले होते. या पोस्टमधून दोघींमधील जवळीक आणि खास नातं स्पष्ट दिसून येत होतं.
मात्र, ही स्टोरी काही वेळातच मौनीच्या अकाउंटवरून गायब झाली. तिने अचानक पोस्ट का हटवली, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण तोपर्यंत अनेक चाहत्यांनी या पोस्टचे स्क्रीनशॉट घेतले होते. आता हे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांमध्येही या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.
mouni roy and disha patani
मौनी आणि दिशा यांना बॉलिवूडमधील बेस्ट फ्रेंड्स मानलं जातं. दोघी अनेकदा एकमेकींसोबत वेळ घालवताना दिसतात. त्यामुळे मौनीने दिशाला “छोटी बहिण” म्हणत केलेली पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. काही जणांनी या मैत्रीचे कौतुक केले, तर काहींना पोस्ट अचानक डिलीट केल्यामुळे आश्चर्य वाटले.
दरम्यान, मौनी रॉय सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. पती सूरज नांबियार यांच्यासोबत तिचा विभक्त होण्याचा निर्णय झाल्याचे अलीकडेच समोर आले होते. दोघांनी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट शेअर करत परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे सध्या मौनीच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, मौनी रॉय नुकतीच ७९व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकली होती. तिच्या ग्लॅमरस लुकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. दुसरीकडे दिशा पाटणीही तिच्या फिटनेस, फॅशन आणि चित्रपटांमुळे सतत चर्चेत असते.





