#mouni roy bikini : लग्नाच्या बातम्यांमध्ये मौनी रॉयने दाखवला बोल्ड अवतार; बिकिनी लूकमध्ये फोटो व्हायरल

मुंबई – बॉलीवूडमध्ये सध्या वेडिंग सीझन सुरू आहे. राजकुमार राव-पत्रलेखा, राहुल नागल-श्रद्धा आर्या, कतरिना-विकी कौशल, अंकिता लोखंडे-विकी जैन यादी सेलिब्रिटींनी लग्न करून आपला संसार थाटला आहे. आता याच यादीत नागिन फेम अभिनेत्री ‘मौनी रॉय’चा सुद्धा नंबर लागणार आहे.
मौनी रॉय येत्या २७ जानेवारीला तिचा बॉयफ्रेंड ‘सूरज नाम्बियार’सोबत गोव्यात लग्न करणार आहे. मौनीच्या या डेस्टिनेशन वेडिंगची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्याहून जास्त चर्चा आहे ती म्हणजे तिचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियार याची.
मौनी रॉयचा बॉयफ्रेंड सूरज नाम्बियार हा दुबईमध्ये राहणारा बिझनेसमन आणि बँक इन्व्हेस्टर आहे. त्यांचा जन्म बंगळुरू येथे जैन कुटुंबात झाला. सूरजचं शालेय शिक्षण इन्टरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूलमधून पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यानं २००८ मध्ये बंगळुरूच्या आरवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून सिव्हिल इंजिनियरिंगची डिग्री घेतली.
मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार यांची ओळखही दुबईमध्ये झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात असलेली मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला असून, लवकरच हे दोघे विवाह बंधनात अडकणार आहे.
दरम्यान, नुकतंच मौनी रॉयने नुकतंच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती प्रचंड बोल्ड दिसत आहे. फोटो मध्ये मौनीने पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तसेच, ती वेगवेगळ्या हॉट पोझ देताना दिसते.






