एअरपोर्टवर दिसला ‘मौनी रॉय’चा क्लासी अंदाज! चेहऱ्यावरील तेज पाहून चाहते पडले प्रेमात
Mouni Roy Airport Look : बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.
तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही ‘घायल’ झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. मोनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या मौनी रॉयने आता टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केला असला तरी टीव्हीच्या जगामध्ये ती अजूनही ओळखली जाते. मौनी रॉयने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मध्ये कृष्णा तुलसीची भूमिका साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
मौनी रॉय तिच्या स्टाईल आणि टॅलेंटच्या बळावर टीव्हीवरून मोठ्या पडद्यावर पोहोचली आणि आता ती खूप नाव कमावत आहे. मौनी रॉयच्या स्टाईलबद्दल बोलायचे झाले तर, ती नेहमीच विमानतळावर क्लासी पोशाखात दिसते.
यावेळी ती विमानतळावर मॅक्सी ड्रेस घालून, हातात जाड पुस्तके घेऊन आणि केसांची वेणी बांधून दिसली. मौनी रॉयचा हा स्टाईल चाहत्यांना खूप आवडला आहे. यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
वर्ष होते 2006- 2008 अवघ्या दोन वर्षात मौनी रॉयने प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रियता मिळवली. तिच्या सौंदर्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या असतात. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे लाखोंच्या घरात चाहते असून, तिच्या प्रत्येक व्हिडिओ-फोटो प्रेम देत असतात. मौनी एक बोल्ड आणि ग्लॅमर्स अभिनेत्री असल्याचं सतत दिसून आलं आहे.





