Mouni Roy : अभिनेत्री ‘मौनी रॉय’चा फेस्टिव्ह लूक चर्चेत; लाल रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य !

Mouni Roy – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.
तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही ‘घायल’ झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. मोनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या मौनी रॉयने आता टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केला असला तरी टीव्हीच्या जगामध्ये ती अजूनही ओळखली जाते. मौनी रॉयने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मध्ये कृष्णा तुलसीची भूमिका साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
वर्ष होते 2006- 2008 अवघ्या दोन वर्षात मौनी रॉयने प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रियता मिळवली. तिच्या सौंदर्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या असतात. मौनी रॉयची ‘श्श्.. फिर कोई है’ ही मालिका आली. 2011 मध्ये मौनी रॉयने ‘देवों के देव महादेव’ नावाचा ऐतिहासिक शो केला होता. मौनी रॉयने टीव्ही इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या मौनी रॉयचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तिचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला. मौनीने लाल रंगाची साडी आणि बॅकलेस ब्लाउज घातला आहे ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक लोकांना खूप आवडला आहे.
गणेशोत्सवादरम्यान अभिनेत्रीने हा लूक केला असून, साडीत मौनी खूपच सुंदर दिसत आहे. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील आहे. अभिनेत्री पारंपरिक लूकमध्ये नेहमीच आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते.





