शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई – मुंबईत 300 एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक यांसह अनेक निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत तब्बल 18 निर्णय घेण्यात आले आहेत. यात बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार आहेत.
तसेच बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील 61 अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
अन्य निर्णय :
– एमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ हजार कोटीची शासन हमी
– जीएसटीमध्ये नवीन 522 पदांना मान्यता
– राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद
– अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड
– उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ
– राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता





