Kangana Ranaut : “बॉलिवूडमधील बहुतेक पुरुष कलाकार असभ्य, असंस्कृत असतात”; कंगणा रानौतचा गंभीर आरोप

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगणा रनौत हि तिच्या बेधड विधानांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असते. नुकत्याच सोशल मीडियावर अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा एक चाहत्यासोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून कंगणाने जया बच्चन यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. आता कंगणाने बॅालिवूडमधील पुरुष कलाकारांबद्दल मत व्यक्त केलं आहे. नुकतीच तिने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने यावर भाष्य केलं आहे.
कंगना आता केवळ अभिनेत्रीच नसून खासदार सुद्धा आहेत. त्यामुळे ती राजकिय मुदद्यावर भाष्य करत असते. बॉलिवूडमध्ये जाणवऱ्या गैरप्रकारांबद्दल ती परखडेपणे बोलते. पण आता तिने बॅालिवूडमधील काही कलाकार असा शब्दप्रयोग करत गंभीर आरोप केला आहे. बॉलिवूडमधील बहुतेक पुरुष कलाकार असभ्य, असंस्कृत असतात, असं ती म्हणाली आहे. काही कलाकार सेटवर उशिरा येतात आणि अभिनेत्रींचा अपमान करत असल्याचा आरोप तिने केला आहे. यामुळे तिच्या या मताची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
नेमकं काय म्हणाली कंगणा?
बॉलिवूडमधील बहुतेक पुरुष कलाकार असभ्य, असंस्कृत असतात. काही कलाकार सेटवर उशिरा येतात, अभिनेत्रींचा सर्रास अपमान करतात, त्यांना छोटी व्हॅनिटी व्हॅन देतात आणि त्यांना पाण्यात बघतात, असा आरोप तिने कुणात्याही पुरुष कलाकाराचे नाव न घेता काही पुरुष कलाकार असं करत असल्याचं ती म्हणाली आहे. तसेच ती पुढे म्हणाली अभिनेत्याचे असे वागणे ती कधीच सहन करत नाही, पण काही अभिनेत्री मात्र, गुमान या गोष्टी सहन करतात.
२००६ मध्ये बॅालिवूडमध्ये एण्ट्री
कंगणा रानौत आता केवळ बॅालिवूडची अभिनेत्री नसून ती एक लोकसभा खासदार आहे. खरंतर कंगणाने २००६ साली गँगस्टर या सिनेमातून बॅालिवूडमध्ये एण्ट्री केली. पदार्पणाच्या पहिल्याच सिनेमाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. यानंतर तिने अनेक हिंदी सिनेमात काम केलं. अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत केलेल्या फॅशन या सिनेमासाठी कंगणाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. तिचे क्वीन, तनु वेड्स मनु हे काही सिनेमे विशेष गाजले. कंगना शेवटची इमर्जन्सी या सिनेमात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसली होती.
हेही वाचा : “एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे”; नाईकांचा खोचक टोला





