मोरगाव: कार-दुचाकीच्या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

मोरगाव – मोरगाव- जेजुरी रस्त्यालगत आंबी पाटी येथे चारचाकी गाडीची दुचाकीला ठोकर लागून झालेल्या अपघातात पिसर्वेतील दाम्पत्याचा मृत्यू झाला. ही घटना (दि.15) सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान घडली. बाळासाहेब मारूती कोलते (वय 47) व कविता बाळासाहेब कोलते (वय 38), असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गजानन साळुंके (रा. वीर, ता. पुरंदर) हे जेजुरीवरुन बारामती येथे चारचाकी गाडीने जात भरधाव वेगाने जात होते. ही गाडी आंबी पाटीदरम्यान आली असताना याचवेळी दुचाकी ही किराणा दुकानाजवळून जोगवडीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूकडे वळत होती. त्यावेळी चारचाकी गाडीने ठोस दिली. यावेळी दुचाकीवरील बाळू मारूती कोलते व त्यांची पत्नी कविता बाळू कोलते हे गंभीर जखमी झाले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वाहनाचे नुकसानीस व मृत्यूस कारणीभुत झाल्याबाबतची तक्रार योगेश कोलते यांनी मोरगाव पोलिसांत दिली आहे. मोरगाव पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास पोलीस ई. शेख करीत आहेत.


