Monsoon Update : राज्यात तीन दिवस राहणार मान्सून सक्रिय; मुसळधार पावसाचा अंदाज
Updated On:

मुंबई – विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यभरात शुक्रवारपासून मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्यात रविवारपासून 29 सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी मान्सून असणार आहे.
तर 26 सप्टेंबरनंतर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि अरबी सुमद्रावर एक सिस्टीम तयार होण्याची शक्यता आहे. त्या सिस्टीमच्या प्रभावामुळे 26 सप्टेंबरपासून मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.





