Monsoon Session 2024 : मुंबईकर खेळाडूंच्या सत्कारावरून विरोधकांचा परिषदेत गोंधळ; नेमकं काय घडलं? पाहा…
Updated On:

Monsoon Session 2024 – टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल 13 वर्षांनी आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (4 जुलै) भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्कार करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना विधानसभेत केली होती.
त्यांच्या या मागणीचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विचार करत सत्कारास मान्यता दिली. पण या कार्यक्रमाच्या फलकावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यांचे फोटो, तसेच सत्कार कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने विरोधकांनी विधान परिषदेत गोंधळ घातला.





