Monsoon Update : शेतकरीराजा चिंतेत..! राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर; अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार?
Monsoon Update : तळकोकणात वेळेत हजेरी लावल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती पूर्णपणे खुंटली आहे.

Monsoon Update : राज्यात मोसमी पाऊस लांबणीवर पडला आहे. ज्यामुळे शेतकरीराजा चिंतेत आहे. देशातील ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मान्सूनने वाटचाल केली आहे. (Monsoon Update)
मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यात मान्सूनचा पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात मान्सूनचा पाऊस काहीसा लांबण्याची चिन्हे आहेत. (Monsoon Update)
मान्सूनची वाटचाल संथगतीने होत असून पुढील 3 ते 4 दिवसांत राज्याच्या आणखीन काही भागात मान्सून दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सध्या दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची नोंद होत आहे. (Monsoon Update)
मुंबईत 11 जून रोजी अपेक्षित असलेला मान्सून लांबणीवर पडला आहे. मुंबईतही नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. पुढील किमान पाच दिवस तरी मुंबईत मान्सून येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत आणि जोपर्यंत मुंबईत मान्सूनची सक्रियता सामान्य होत नाही, तोपर्यंत तापमान चढेच राहील. (Monsoon Update)





